कोणासारखं? (कविता)
Info Post
गाणं गावं हरिदासांसारखं
स्वत:ला विसरून देवासाठी
काव्य करावं कालिदासासारखं
नको प्रसिद्धीच्या हव्यासापोटी
बासरी वाजवावी कृष्णासारखी
ज्याने चराचरही तल्लीन होतील
वीणावादन सरस्वतीप्रमाणे
ज्याने पतितही पावन होतील
चित्र रेखाटावं रवी वर्म्यानसारखं
0 comments:
Post a Comment