आस...(कविता)
Info Post
छायाचित्र आंतरजालावरून
चैत्राने बघ दिली पालवी
तरुवर वेलींना...
नभानेही दिधला मृद्गंध
या अतुष्ट धरणीला...
तूही आता
सोड अबोला
अन दर्शन दे नयनांस...
आता तुझीच जीवा रे आस....
आम्र मोहरता
कोकीळ भुलले ...
मेघ दाटता
मयूरही फुलले...
तुलाच कसे ना
काहीच रीझवे
करिसी मज का उदास...
आता तुझीच जीवा रे आस....
0 comments:
Post a Comment